अंडी फुटल्यानंतर गर्भवती होण्याची शक्यता काय आहे?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:42

महिलांना कधी कधी गर्भाशयातील एक अंडाशयामध्ये ओवरी सिस्‍ट, ओवेरियन कॅन्सर किंवा एंडोमेट्रियोसिस यासारख्या समस्या उद्भवल्याने एक अंडाशय काढून टाकावं लागतं.
तुम्हाला हे माहीतच असले की स्त्रीमध्ये गर्भधारणा व्हायची असेल तर त्यामध्ये अंडाशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे अंडाशय गरोदरणाचा पाया आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. म्हणून अंडाशय हा स्त्रीच्या शरीरातील महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. हे अंडाशय म्हणूनच सुदृढ आणि निरोगी असणे गरजेचे असते पण कधी कधी काही कारणांमुळे स्त्रीचे एक अंडाशय काढले जाते. अशावेळी त्या स्त्रीच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की उरलेल्या एका अंडाशयाच्या जोरावर ती गरोदर राहू शकते का? त्यामुळे गरोदरपणात काही समस्या तर येणार नाही ना? मी आई बनू शकेन ना?तर त्याचे उत्तर आहे हो..! स्त्री एका अंडाशयाच्या जोरावरही गरोदर राहू शकते. ज्याप्रमाणे दोन अंडाशय असणाऱ्या स्त्रिया सामान्य पद्धतीने गरोदर राहतात तशाच एक अंडाशय असलेल्या स्त्रिया सुद्धा गरोदर राहू शकतात. काही आजारपणामुळे वा शरीरातील त्रासामुळे स्त्रीचे एक अंडाशय काढावे लागते, तर काही स्त्रियांना जन्मापासून एकाच अंडाशय असते. चला जाणून घेऊया एक अंडाशय असल्याने नेमके गरोदरपणात काय फरक पडतात.
एका अंडाशयाचा गर्भधारणेवर प्रभाव

एक अंडाशय असूनही स्त्री गरोदर राहू शकते. पण त्या स्त्रीचे अंडाशय नक्की कोणत्या कारणासाठी काढले गेले आहे ते देखील इथे पाहणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. जर एखाद्या गंभीर आजारामुळे व समस्येमुळे अंडाशय काढले गेले असेल तर मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अतिशय कमी असते. एक अंडाशय असेल आणि फेलोपियन ट्यूब सुस्थितीत असेल तर स्त्री गरोदर राहू शकते. पण फार कमी स्त्रिया एका अंडाशयामुळे गरोदर राहू शकत नाहीत. सामान्यत: एका अंडाशयामुळे स्त्री वर जास्त फरक पडत नाही.
एका अंडाशयासह गरोदर राहण्याचे मार्ग

अनेक स्त्रियांमध्ये एक अंडाशय असले तरी गरोदर राहण्याची प्रक्रिया सामान्य स्त्रियांसारखीच होत असते. या स्त्रियांना गरोदर राहण्यात कोणतीच समस्या येत नाही परंतु जर ओव्ह्युलेशन अनियमित असले तर मात्र गरोदर होण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. आता आम्ही तुम्हाला काही असे मार्ग सांगणार आहोत जे एक अंडाशय असतानाही गरोदर राहण्यात तुमची मदत करू शकतील. हे मार्ग अतिशय सामान्य आहेत आणि यामुळे गरोदर होण्याच्या शक्यता अनेक पटीने वाढतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info